असोगा मलप्रभानदीवरील बंधार्याला गळती , पाण्याचा साठा झाला कमी. खानापूर प्रतिनिधी
असोगा मलप्रभानदीवरील बंधार्याला गळती , पाण्याचा साठा झाला कमी.
खानापूर प्रतिनिधी
खानापूर तालुक्यातील असोगा येथील मलप्रभा नदीवरील बंधार्याला बर्याच ठिकाणी गळती झाल्याने तसेच फळ्यामधुन पाणी वाहत असल्याने काही दिवसातच पाण्याचा साठा कमी होऊण पाण्याची टंचाई भासणार आहे.
तेव्हा संबधित खात्याच्या अधिकार्यानी असोगा येथील मलप्रभानदीवरील बंधार्याची त्वरीत दखल घेऊन गळती थांबवावी. अशी मागणी अँड. चेतन मणेरीकर यानी वार्ताशक्तीशी बोलताना केली आहे.
यावेळी बोलताना अँड चेतन मणेरीकर म्हणाले की, यंदा पावसाचे प्रमाण कमी झाले आहे.त्यामुळे पाण्याचा साठा नदी नाल्याना कमी झाला आहे. त्यामुळे भविष्यात असोगा बंधारा कोरडा पडण्याची भिती भेडसावित आहे.सध्या बंधार्याच्या फळ्यातुन पाण्याची गळती मोठ्या प्रमाणात होत आहे. ती गळती थांबली पाहिजे अन्यथा वर्षभर पिकाना पाणी मिळणे कठीण होणार आहे.
याकडे आमदार विठ्ठलराव हलगेकरल यानी जातीने लक्ष देऊण सुस्तावलेल्या संबंधित खात्याच्या अधिकार्याना जागे करून समस्या सोडविण्याची मागणी केली आहे.